सरकारी कार्यालयांवर प्लास्टिक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

मुंबई : कर्जत तालुक्‍यातील राज्य सरकारी कार्यालयांच्या इमारती जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात गळती रोखण्यासाठी या इमारतींच्या छतावर प्लास्टिकचे आच्छादन टाकावे लागते. यावर्षी सरकारी कार्यालयांच्या छतावर तब्बल १८०० चौरस मीटर प्लास्टिक टाकण्यात आले आहे. आता सर्व सरकारी कार्यालये एकाच इमारतीत येण्याचे संकेत मिळाले असले, तरी कृषी विभाग जमीन देत नसल्यामुळे हे प्रशासकीय भवन पोलिस मैदान परिसरात उभारले जाणार आहे. त्‍यामुळे सरकारी कार्यालयाची प्रतीक्षा कायम आहे. 

कर्जत तालुक्‍यातील बहुतेक सर्व सरकारी कार्यालये जुनी असून, तहसील कार्यालय ब्रिटिशकालीन आहे. अनेक इमारती जीर्ण झाल्याने छतातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते. त्यामुळे सरकारी कार्यालयांतील कागदपत्रे भिजू नयेत म्हणून काही वर्षांपासून या इमारतींच्या छतावर प्लास्टिकचे आच्छादन घातले जाते.  
या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यातील राज्य सरकारशी संबंधित सर्व कार्यालये एकाच इमारतीत आणण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रयत्न होता.

स्थानिक आमदार सुरेश लाड यांनी त्यासाठी सरकारने निधी द्यावा, अशी मागणी लावून धरली.  पावसापासून संरक्षण करण्यासाठी कर्जत तहसील कार्यालय, सेतू कार्यालय, त्याच परिसरातील पोलिस ठाण्यातील आरोपींची कोठडी, सहनिबंधक कार्यालय, संजय गांधी निराधार योजना कार्यालय आणि तेथील अभिलेख कक्ष आदी इमारतींवर प्लास्टिकचे आच्छादन घालण्यात आले आहे. 

अभिनव शाळेच्या परिसरातील दिवाणी न्यायालय, बाजारपेठ भागातील पोलिस वसाहत, पोलिस निरीक्षकांचा बंगला, पोलिस उपअधीक्षकांचे कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, कर्जत भिसेगाव आणि नेरळ येथील महसूल खात्याची गोदामे यांना प्लास्टिकने झाकून टाकण्यात आले आहे. माथेरान येथील महसूल अधीक्षक कार्यालय, पोलिस ठाणे, पोलिस वसाहत या इमारतींवरही प्लास्टिकचे आच्छादन घालण्यात आले आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plastic at Government Offices