प्लास्टिकमुक्तीसाठी तलासरीत कारवाई

तलासरी ः विक्रेत्यांवर कारवाई करताना विशेष पथक.
तलासरी ः विक्रेत्यांवर कारवाई करताना विशेष पथक.

तलासरी ः तलासरी नगरपंचायतीच्या विशेष पथकाने सोमवारी दिवसभर शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम राबविली. यात नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी भाजीविक्रीसाठी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या भाजीविक्रेत्यांवर कारवाई केली. भाजीविक्रेत्याला तीन वेळा ताकीद देऊनही त्याने प्लास्टिकचा वापर सुरूच ठेवल्याने त्याच्याकडून अडीच हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

शहरात पुन्हा प्लास्टिकने डोके वर काढल्याने नगरपंचायतीतर्फे गेल्या १० ते १५ दिवस शहरातील दुकानदार, व्यापारी आणि नागरिकांना प्लास्टिक पिशवी वापरावर बंदी घालण्यात आली आहे. कागदी, कापडी पिशवीचा वापर करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. त्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करण्याऱ्या शहरातील व्यापारी, दुकानदारांकडे यापुढे प्लास्टिक पिशवी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा नगरपंचायत प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com