कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची प्लास्टिक जप्तीची मोहीम; 53 हजार रुपये दंड वसूल

Plastic Sanitation Campaign of Kalyan Dombivli Municipal Corporation
Plastic Sanitation Campaign of Kalyan Dombivli Municipal Corporation

मुंबई : कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तपणे कारवाई करत प्लास्टिक जप्तीची मोहीम सुरू केली. कल्याण शहरातील मुख्य बाजारपेठेत तसेच भाजीमंडईत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 550 किलो प्लास्टिक जमा करण्यात आले. तसेच 53 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. 

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई रवींद्रन यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेत विविध विभागात तील अधिकाऱ्यांना एक ऑक्टोबरपासून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मार्च महिन्यात राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची घोषणा केली होती. त्याला 23 जून पर्यंत मुदतवाढ मिळाली होती. 24 जून पासून राज्यभरात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली होती. या बंदीनंतर विविध दूध डेअरी तसेच टेट्रा पॅकिंग मध्ये विक्री होत असलेल्या पदार्थाच्या उत्पादकांना वापर झालेल्या प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी यंत्रणा उभी करणे बंधनकारक करण्यात आले होते. रविवार 30 सप्टेंबरपर्यंत यासाठी संबंधितांना मुदत देण्यात आली होती. त्यामुळे एक ऑक्टोबरपासून किरकोळ विक्रेत्यांजवळील प्लास्टिक वर जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली.

आज कल्याण शहरात भाजी मार्केट तसेच शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानांवर ही कारवाई करण्यात आली. या विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेल्या प्लास्टिकच्या साहित्यावर पिशव्यांवर त्याच्या उत्पादकाचे नाव ठळकपणे असणे अपेक्षित आहे होते. मात्र अशा प्रकारचा कोणताही उल्लेख न आढळल्याने व्यापाऱ्यांकडील प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या. 

किरकोळ विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेल्या प्लास्टिकचे रिसायकलिंग होते अथवा नाही याची खातरजमा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्लास्टिक रिसायकलिंग करण्याचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. मात्र पालिकेकडून जप्त करण्यात आलेले प्लास्टिक पुनर्वापरासाठी उर्जा फाउंडेशन तसेच पर्यावरण दक्षता मंचाकडे सुपूर्द केले जाते. 

प्लास्टिक उत्पादकांसाठी एक्सटेंडेड प्रोड्यूसर रिस्पानसिबीलिटी अर्थात त्यांच्या वाढीव जबाबदारीबद्दल ऑगस्ट महिन्यात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापपर्यंत या संदर्भात एकही अर्ज आलेला नाही. या सर्व संदर्भात कडक मोहीम राबविण्याच्या दृष्टीने नियंत्रण मंडळ काम करत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याबरोबर कोकण विभागातील संबंधित अधिकार्‍यांची पहिली बैठक गुरुवार ऑक्टोबर रोजी होणार आहे.

मोठ्या प्रमाणात पालिकेकडे प्लास्टिक जमा झाल्यास ते अंबरनाथ येथील रिसायकलिंग युनिटमध्ये पाठवण्यात येईल. मात्र सध्या जमा होत असलेले प्लास्टिक पुनर्वापरासाठी दोन संस्थांकडे सुपूर्द केले जाते. - धनाजी तोरस्कर, उपायुक्त,  घनकचरा व्यवस्थापन 

यापुढील पंधरा दिवस सातत्याने ही कारवाई करण्यात येईल. किरकोळ विक्रेत्यांकडील प्लास्टिकवर त्याच्या उत्पादकांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख अपेक्षित आहे. जेणेकरून त्या उत्पादकाकडून प्लॅस्टिकच्या रिसायकलिंगसाठी काय केले जाते हे स्पष्ट होईल. - धनंजय पाटील, विभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com