बेलापूर, वाशी, कोपरखैरणेत विक्रेत्यांकडून प्लास्टिक जप्त 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

नवी मुंबई - शहरातून प्लास्टिकचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महापालिकेच्या प्लास्टिक विरोधी मोहिमेंतर्गत बड्या व्यावसायिकांनंतर किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई सुरू झाली आहे. सोमवारी दिवसभरात प्लास्टिक विरोधी पथकाने बेलापूर, वाशी, कोपरखैरणे परिसरातील रस्त्यांवर बसणारे फेरीवाले व दुकानांमधील किरकोळ विक्रेत्यांवर छापा मारला. या कारवाईत प्लास्टिकच्या पिशव्या व वस्तू बाळगल्याप्रकरणी सुमारे 15 हजार रुपयांचा दंड आकारला; परंतु पालिकेच्या या धडक कारवाईमुळे प्लास्टिकच्या बड्या व्यापाऱ्यांनंतर आता किरकोळ विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली आहे. 

महिनाभरात महापालिकेच्या पथकांनी बेलापूर, दारावे, तुर्भे, एपीएमसी मार्केट, वाशी या भागात विविध ठिकाणी कारवाई करून सुमारे 40 किलो प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे. तसेच हे प्लास्टिक या व्यापाऱ्यांकडे कुठून येते, याचा माग काढण्यासही सुरुवात केली आहे. बड्या व्यापाऱ्यांसोबत त्यांच्याकडून प्लास्टिकच्या पिशव्या व वस्तू खरेदी करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांच्या दिशेने रोख वळवला आहे. रस्त्यावर, पदपथावर व दुकानांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये सामान देणाऱ्यांवर पालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वाशी, सेक्‍टर-1 येथे चिकन सेंटर व कबाब सेंटरवर कारवाई करून प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या. कोपरखैरणे विभागात रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करून प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या. 

15 हजार दंड वसूल 
बेलापूर विभागातील तीन दुकानांवर कारवाई करीत प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास, कंटेनर अशा स्वरूपाच्या प्लास्टिकच्या वस्तू जप्त केल्या. दिवसभरात बेलापूर, वाशी व कोपरखैरणे येथे केलेल्या कारवाईतून पालिकेच्या पथकांनी 15 हजार रुपयांचा दंड गोळा केला आहे. 

Web Title: Plastics seized from Belapur, Vashi, Koparkhakharan vendors

टॅग्स