बोर्डीरोड रेल्वे स्थानकाला तब्बल चोविस वर्षाने फलाट

अच्युत पाटील
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

कृषी विकास, मत्सोद्योग आणि उद्योगिक विकास साधण्यासाठी तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव ग्रामपंचायत क्षेत्रात पश्चिम रेल्वेवर 1994 बोर्डी रोड रेल्वे स्थानक उभारण्यात आले. मात्र गेली चोविस वर्षे या स्थनकाला फलाटाची सुविधा करून देण्यात आली नव्हती.

बोर्डी - तलासरी तालुक्याच्या विकासाला वरदान ठरणाऱ्या पश्चिम रेल्वेवरील बोर्डीरोड रेल्वे स्थानकाला तब्बल चोविस वर्षाने कमी उंचीचा का असेना फलाट बांधण्यात आला. आता अधिक गाड्यांना थांबा कधी देणार? असा प्रश्न प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे.

कृषी विकास, मत्सोद्योग आणि उद्योगिक विकास साधण्यासाठी तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव ग्रामपंचायत क्षेत्रात पश्चिम रेल्वेवर 1994 बोर्डी रोड रेल्वे स्थानक उभारण्यात आले. मात्र गेली चोविस वर्षे या स्थनकाला फलाटाची सुविधा करून देण्यात आली नव्हती. तर मुंबई व सुरतकडे जाणाऱ्या फक्त दोन शटल गाड्याना थांबा देण्यात आला आहे.

Bordi Railway

बलसाड फास्ट पॅसेंजर सह मुंबई सुरतकडे जाणाऱ्या सर्व शटल, मेमू गाड्यांना थांबा व फलाट बांधून देण्यात यावा अशी सातत्यने मागणी केली जात होती. मात्र रेल्वे प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.

स्थानिक ग्रामस्थांच्या सततच्या पाठपुरावा झाल्याने तसेच तात्कालीन खासदार चिंतामण वनग यांचे प्रयत्नातून फलाटाचे काम तर झाले आता गाड्यांना थांबा कधी देणार, असा प्रश्न प्रवासी करीत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: A platform has been constructed after tweentyfour year at the Bordi Road Railway Station