कृपया कांद्याचा आग्रह करू नका! 

कृपया कांद्याचा आग्रह करू नका! 


वाशी :  सर्वसामान्यांच्या आवाक्‍याच्या बाहेर गेलेल्या आणि फळापेक्षाही अधिक महागलेल्या कांद्याने खवय्यांचे वांदे केलेले आहेत. नवी मुंबईतील तुर्भे एपीएमसी मार्केट रोडवर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये ‘ग्राहकांना नम्र विनंती, कांदा मागण्यास आग्रह करू नये’ अशा पाट्या दिसू लागल्या आहेत; तर काही हॉटेलमध्ये राईस प्लेटमध्ये कांद्याच्या कापांऐवजी किसलेला कोबी, मुळा व गाजराचे सॅलड देणे सुरू झाले आहे.


ओला कांदा बाजारात काही प्रमाणात असला तरी त्या कांद्यालादेखील शंभर रुपये मोजावे लागत आहे; तर सुका कांदा हा १५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. एपीएमसीत इजिप्तचा कांदादेखील दाखल झाला आहे; मात्र हादेखील कांदा तब्बल १२० रुपये किलोने विकला जात आहे. कांदा महागल्याने त्याचा परिणाम हॉटेल व्यावसायिकांवर झाला आहे.


एपीएमसी मार्केटमधील सिग्नलजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये कांद्याचा आग्रह धरू नये असा फलक लावण्यात आला आहे. महागलेल्या कांद्यामुळे हॉटेल व्यावसायिकच नाही, तर खवय्यांच्या डोळ्यातदेखील पाणी आणले आहे. याबाबत हॉटेल व्यावसायिकाकडे विचारणा केली असता कांदा हा सर्वच जेवणात वापरला जातो, परंतु आता दर वाढल्याने पर्याय नसल्याने हा फलक लावण्यात आल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com