
PM Modi Mumbai Visit : मानलचं पाहिजे राव! एका दमात PM मोदींनी घेतली सर्व तीर्थस्थानांची नावं
PM MOdi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून, अवघ्या महिनाभरात पंतप्रधान मोदींचा हा दुसरा मुंबई दौरा आहे.
आजच्या मुंबई दौऱ्यात मोदींनी मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
आजच्या या ट्रेनमुळे आता मुंबईहून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांची संख्या तीन झाली असून, देशातील एकूण संख्या १० झाली आहे.
वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मोदींनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी मोदींनी एकादमात राज्यातील प्रमुख तीर्थस्थळांची नावे घेतली. यानंतर मोदींच्या पाठांतराचे सगळीकडून तोंडभरून कौतुक केले जात आहे.
सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमुळे सोलापूरमधील सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, सोलापूरजवळील पंढरपूर आणि पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे जाणाऱ्या यात्रेकरूंची सोय होणार असल्याचे मोदी म्हणाले.
तर, मुंबई शिर्डी वंदे भारत ट्रेनुमळे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, शिर्डी आणि शनी शिंगणापूर येथे जाणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे.
मध्य रेल्वेकडून भाडे जाहीर
दरम्यान, आज हिरवा झेंडा दाखवलेल्या महाराष्ट्रातील मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे भाडे जाहीर केले.
मध्य रेल्वेच्या (CR) अधिकाऱ्याने सांगितले की, CSMT सोलापूर वंदे भारत ट्रेनसाठी केटरिंग सेवेशिवाय एकेरी भाडे चेअर कारसाठी 1,000 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी 2,015 रुपये असेल. दोन्ही वर्गांसाठी अनुक्रमे 1,300 रुपये आणि 2,365 रुपये असेल.
सीएसएमटी-साईनगर शिर्डी ट्रेनचे केटरिंग सेवेशिवाय एकेरी तिकीट चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी अनुक्रमे 840 रुपये आणि 1670 रुपये असेल. मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस ही ट्रेन धावणार आहे.