पंतप्रधानांचा मुंबई दौरा आयत्या वेळी रद्द

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारचा (ता.19) मुंबई दौरा रद्द करण्यात आला आहे. मेट्रो रेल्वेचे भूमिपूजन आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील "कोल्ड प्ले' या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार होते. मात्र, नोटा बाद केल्यावरून वाद सुरू असताना देशाच्या आर्थिक राजधानीत त्याचा फटका बसू नये म्हणून पंतप्रधानांनी हा दौरा रद्द केल्याचे समजते.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबाबत दोन दिवसांपूर्वी मुंबईतील भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. मेट्रो रेल्वेच्या वडाळा-घाटकोपर-ठाणे या मार्गाचे भूमिपूजन चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात पंतप्रधानांच्या हस्ते होणार होते. यानिमित्ताने पंतप्रधानांची सभाही होणार होती. त्यानंतर वांद्रे-कुर्ला संकुलातील "कोल्ड प्ले' कार्यक्रमाला पंतप्रधान जाणार होते.

नोटा बाद करण्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. ग्रामीण भागातही नाराजी आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी करमणुकीच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यास विरोधक त्याचे राजकीय भांडवल करण्याची शक्‍यता आहे. व्यापाऱ्यांमध्येही नाराजी आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत त्याचे पडसाद उमटल्यास भाजपला फटका बसण्याचा धोका आहे. त्यामुळे हा दौरा आयत्या वेळी रद्द करण्यात आला असल्याचे समजते.

Web Title: pm modi's mumbai visit cancelled