निवडणुकीच्या धामधुमीत मोदींचा बायोपीक, प्रदर्शनाची तारीख बदलली!

निवडणुकीच्या धामधुमीत मोदींचा बायोपीक, प्रदर्शनाची तारीख बदलली!

मुंबई - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक येणार आहे. यामध्ये विवेक ओबेरॉय मोदींची भूमिका साकारणार आहे. यामध्ये विवेकचे वेगवेगळे नऊ लूक असणार आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत हा चित्रपट येणार असल्याने सध्या चांगलीच त्याची चर्चा आहे. सुरुवातील 12 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र आता त्याची तारिख अलिकडे करण्यात आली असून, 5 एप्रिललाच चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.

यासंदर्भात विवेक ओबेरॉयने काही वेळापूर्वी ट्विट केले आहे. यामध्ये चित्रपटाच्या पोस्टरवर तारिख बदलण्यात आली आहे. 

या बोयोपीकचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे. या सिनेमात बरखा बिष्ट ही मोदींच्या पत्नी अर्थात जसोदाबेन यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर झरीना वहाब मोदींच्या आईंची हीराबेन यांची व्यक्तिरेखा वठवणार आहेत. मनोज जोशी सिनेमात अमित शहा यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. सुरेश ओबेरॉय आणि संदीप सिंग यांनी या सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी स्वीकारली आहे. या सिनेमात मोदींच्या फक्त खासगी आयुष्याबद्दलच लोकांना सांगितले असे नसून एक कार्यकर्ता ते भारताचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com