PMC bank fraud | येस बँकेचा संस्थापक राणा कपूरला EDकडून अटक

PMC bank fraud | येस बँकेचा संस्थापक राणा कपूरला EDकडून अटक

मुंबई - पंजाब अँड महाराष्ट्र कॉ-ऑपरेटीव्ही(पीएमसी) बँक गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने(enforcement directorate) येस बँकेचा संस्थापक राणा कपूरला बुधवारी अटक केली. येस बँकेने 200 कोटी रुपयांचे कर्ज मॅक स्टार मार्केटींगला दिले होते. त्याचे लागेबांधे एचडीआयएल असून त्याच्या मार्फत मनी लाँडरींग करण्यात आल्याचा ईडीला संशय आहे.

पीएमसी बँकेतील 4355 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने  एचडीआयएलचे राकेश वाधवान, सारंग वाधवान, वारियम सिंग, जॉय थॉमस व इतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गैरव्यवहारातील 95 कोटी एचडीआयएलच्या मार्फत प्रवीण राऊतने इतर ठिकाणी वळते केल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या व्यवहाराचे कोणतेही कागदपत्रे करण्यात आलेली नाहीत.ईडीने दिलेल्या माहितीनुसार, रकमेच्या माध्यमातून पालघर येथे जमीन घेण्यात आली होती. याशिवाय गैरव्यवहारातील एक कोटी 60 लाख प्रवीणने त्याची पत्नी माधुरी राऊतला दिले होते. त्यातील 55 लाख रुपये(23 डिसेंबर, 2010 ला 50 लाख व 15 मार्च 2011 ला पाच लाख रुपये) विनाव्याजी कर्ज म्हणून शिवसेने नेते संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना देण्यात आले होते. त्या रकमेतून दादर पूर्व येथे घर खरेदी करण्यात आले होते. याशिवाय माधुरी राऊत व वर्षा राऊत या मे. अवनी कन्स्ट्रक्शन कंपनीत भागिदार असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. तेथे केवळ पाच हजार 625 रुपयांचे योगदान असताना त्यांना 12 लाख रुपये ओव्हरड्रॉन कॅपिटलच्या रुपाने मिळाले होते.

पुढे ते कर्जांत रुपांतरीत झाले. ही रक्कम राऊत यांच्याकडून नुकतीच परत करण्यात आली आहे. याशिवाय याप्रकरणी विवा ग्रुपच्याही पाच ठिकाणांवर शोध मोहिम राबवण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या व्यवस्थापकीय संचालकासह दोघांना ईडीने अटक केली. त्यावेळी तपासात मॅक स्टारने दोन मालमत्ता विवा ग्रुपच्या नावावर केल्या होत्या. हाच सर्व व्यवहार सध्या ईडीच्या रडावर आला आहे.

--------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

PMC bank fraud Yes Bank founder Rana Kapoor arrested by ED 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com