मोठी बातमी : PMC खातेधारकांना मिळणार दिलासा; सरकार घेणार 'हा' मोठा निर्णय

मोठी बातमी : PMC खातेधारकांना मिळणार दिलासा; सरकार घेणार 'हा' मोठा निर्णय

PMC बँक घोटाळा गेल्या काही दिवसापासून गाजतोय. PMC बँकेविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलनं देखील सुरु आहेत. यामध्ये अनेकांनी आपले प्राण देखील गमावले आहेत.  अशातच आता PMC बँक ही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलिन करण्याचा विचार सुरु असल्याची बातमी समोर येतेय. राज्य सरकारकडून PMC खातेदाराकांसाठी हा मोठा दिलासा असल्याचं बोललं जातंय. 

PMC बँकेतील खातेधाराकांचं नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे विलीनीकरणासाठी विचारणा केली असल्याची माहिती समोर येतेय. दरम्यान गरज पडल्यास राज्य सरकार  रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) शी देखील चर्चा करणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे PMC बँक खातेधाराकांसाठी राज्य सरकाने घेतलेला हा निर्णय मोठा मानला जातोय. 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षांसोबत जयंत पाटील यांनी चर्चा केली. यामध्ये PMC बँकेतील खातेधाराकांचं नुकसान होऊ नये म्हणून PMC बँकेचं राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करता येईल का? याबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर महाविकास आघाडीचे मंत्री जयंत पाटील यांनी, तुमचे पैसे बुडणार नाहीत असा विश्वास दिलाय. राज्य सहकारी बँकेचं आरोग्य चांगलं आहे. त्यामुळे या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं देखील महाविकास आघाडीचे मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलंय.  

दरम्यान या सर्व प्रक्रियेला आणखी एक ते दीड महिना लागू शकतो.     

Web Title : big relief to PMC bank account holders as PMC might be merged with mahaarshtra state cooperative bank

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com