पीएमसी बॅंक गैरव्यवहार : रजिस्ट्रारच्या डोळ्यातही धूळफेक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेच्या थकीत कर्जांची माहिती लपवण्यासाठी एचडीआयएल ग्रुपने रजिस्ट्रारच्याही डोळ्यात धूळफेक केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यासाठी खातेपुस्तकांत चुकीच्या नोंदी करण्यात आल्याचा संशय आर्थिक गुन्हे शाखेला आहे.

मुंबई - पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेच्या थकीत कर्जांची माहिती लपवण्यासाठी एचडीआयएल ग्रुपने रजिस्ट्रारच्याही डोळ्यात धूळफेक केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यासाठी खातेपुस्तकांत चुकीच्या नोंदी करण्यात आल्याचा संशय आर्थिक गुन्हे शाखेला आहे. 

पीएमसी बॅंकेतून कर्ज घेतल्यानंतर एचडीआयएल समूहाच्या नावे कर्जखाते उघडण्याऐवजी ओव्हरड्राफ्ट घेत असल्याचे दाखवण्यात आले होते. बनावट ‘केवायसी’ (ग्राहकाची माहिती) दाखल करण्याच्या या प्रकाराचा तपास सुरू आहे. एका राष्ट्रीयीकृत बॅंकेकडून घेतलेले ९० कोटींचे कर्जही एचडीआयएलने फेडल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले. या प्रकरणातील ४४ संशयास्पद खात्यांपैकी १० खाती एचडीआयएल समूहाशी संबंधित आहेत. या खात्यांमधील गैरव्यवहार लपवण्यासाठी सुमारे २१ हजार बनावट खाती निर्माण केली होती. या खात्यांना बॅंकेतील निष्क्रिय (डॉर्मंट) खात्यांच्या धारकांची नावे दिली होती. हीच खाती सुरुवातीला रिझर्व्ह बॅंकेला दाखवण्यात आली. या खात्यांद्वारे ४३५५ कोटींचे मुद्दल व व्याज बुडवण्यात आल्याचे दाखवण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMC Bank scam registar hdil group