PMC Bank Scam : महिला खातेदाराची झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या

PMC Bank Scam : महिला खातेदाराची झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या

मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह (पीएमसी) बँकेत गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. त्यामुळे अनेक खातेदारांचे लाखो रूपये अडकले आहेत. या चिंतेतून आत्तापर्यंत दोघांना जीव गमवावा लागला. त्यानंतर आता यामध्ये आणखी एकाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या बँकेच्या महिला खातेदाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली.

पीएमसी बँक गैरव्यवहार समोर आल्यानंतर अनेक खातेदार मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यातच पैसे काढण्यावरही बँकेने निर्बंध आणले आहेत. फक्त ठराविक रक्कम काढण्याची मुभा बँकेने दिली. त्यामुळे आत्तापर्यंत संजय गुलाटी (51) आणि फत्तेमुल पंजाबी (59) यांना जीव गमवावा लागला. ही घटना ताजी असतानाच आता तणावामुळे एका महिलेने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली.

अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहणाऱ्या डॉ. योगिता बिजलानी यांचे खाते या बँकेत आहे. एक कोटींची रक्कम त्यांची या बँकेत आहे. मात्र, हा गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर त्या प्रचंड नैराश्येत होत्या. या नैराश्यातून त्यांनी झोपेच्या गोळ्या आपले जीवन संपवले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com