पीएमसी बॅंक गैरव्यवहार : माजी संचालक अरोरा अटकेत

file photo
file photo

मुंबई : पंजाब ऍण्ड महाराष्ट्र बॅंक (पीएमसी बॅंक) गैरव्यवहाराच्या प्रकरणात पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी (ता. 16) माजी संचालक सुरजितसिंग अरोरा यांना अटक केली. त्यामुळे अटक झालेल्यांची संख्या पाचवर गेली आहे. 

एचडीआयएल कंपनीला नियमबाह्य कर्ज देणे व अन्य प्रकरणांत रिझर्व्ह बॅंकेने पीएमसी बॅंकेवर निर्बंध आणले आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अरोरा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा मोबाईल बंद होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांना शोधून दिवसभर चौकशी केल्यावर सायंकाळी अटक केली. पोलिसांच्या तपासात पीएमसी बॅंकेचे माजी संचालक व कर्ज समितीचे सदस्य असलेले अरोरा यांचे नाव पुढे आले होते. 

या प्रकरणी पोलिसांनी एचडीआयएल कंपनीचे प्रवर्तक असलेले पिता-पुत्र राकेश व सारंग वाधवा, पीएमसी बॅंकेचे संचालक वरयाम सिंग, निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना अटक केली होती. त्यानंतर अरोरा यांना अटक करण्यात आली आहे. पीएमसी बॅंक गैरव्यवहारात लाखो रुपयांच्या ठेवी गमावाव्या लागलेल्या फतोमल पंजाबी आणि संजय गुलाटी यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com