प्रसादात विषबाधा करण्याचा कट; एटीएसची दहाजणांविरोधात कारवाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक डॉ. झाकिर नाईकच्या प्रभावात येऊन अतिरेकी कारवाया केल्याचा आरोप असलेल्या दहाजणांविरोधात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) विशेष न्यायालयात नुकतेच आरोपपत्र दाखल केले.

मुंबई- वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक डॉ. झाकिर नाईकच्या प्रभावात येऊन अतिरेकी कारवाया केल्याचा आरोप असलेल्या दहाजणांविरोधात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) विशेष न्यायालयात नुकतेच आरोपपत्र दाखल केले.

मुंब्रामधील मंदिराच्या प्रसादामध्ये विष मिसळून घातपात घडवून आणण्याचा कट आरोपींनी केला होता, असा आरोप एटीएसने ठेवला आहे. चालू वर्षी जानेवारीमध्ये एटीएसने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा आणि औरंगाबादमधून उम्मत ए मोहम्मदीया या संघटनेच्या दहाजणांना अटक केली होती.

मुंब्रामधील एका टेकडीवर त्यांनी स्फोटके आणि विष तयार करण्याचे प्रशिक्षणही त्यांनी घेतले होते. आणि मुंब्रामधील ऐतिहासिक मुंब्रेश्‍वर मंदिराच्या महाप्रसादामध्ये घातक रसायने मिसळून घातपात करण्याचा कट आखला होता, असा एटीएसचा आरोप आहे.

दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी (आयएस) आरोपी संबंधित असून नाईकच्या चिथावणीखोर भाषणाच्या प्रभावात होते, नाईकचे अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ आरोपींच्या सोशल मिडियावर पोलिसांना सापडले आहेत. परदेशातील अतिरेक्‍यांच्या संपर्कात काही आरोपी होते, असे आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poisoning conspiracy ATS action against ten People