भायखळा तुरूंगातील कैद्यांना विषबाधा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

मुंबई - मुंबईच्या महिला कैद्यांच्या भायखळा जेलमधील 58 कैद्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या कैद्यांना सर जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळचा नाश्ता झाल्यानंतर काही वेळाने कैद्यांनी मळमळत असल्याची तक्रार केली. काही कैद्यांना उलट्या देखील सुरू झाल्या. त्यानंतर प्रशासनाने तात्काळ या कैद्यांना रुग्णालयात दाखल केले.

सर जे.जे. रुग्णालयाचे प्रभावी अधिष्ठाता डॉ. मुकुंद तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आत्तापर्यंत रुग्णालयात 58 कैद्यांना आणण्यात आले असून, या कैद्यांवर उपचार सुरू आहेत. अजूनही कैद्यांना जेलमधून आणलं जाते आहे. अन्नातून विषबाधा झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असला तरी कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. या कैद्यांना उलट्या होत आहेत.

डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही कैद्याची परिस्थिती गंभीर नाही. सर्व कैद्यांना प्राथमिक उपचार म्हणून अॅन्टीबायोटीक देण्यात येत आहे. उलटी होण्यासोबतच चक्कर येण्याची तक्रारही कैद्यांनी केली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत.

Web Title: Poisoning to prisoners in Byculla jail