मुंबईच्या भांडूपमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

16 विद्यार्थ्यांना आणि एका शिक्षिकेला ही विषबाधा झाली आहे. या सर्वांना मुलुंडमधील अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुंबई : मुंबईच्या भांडूपमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. सह्याद्री विद्यामंदिर शाळेतील हे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांसह शिक्षिकेलाही विषबाधा झाली आहे.

16 विद्यार्थ्यांना आणि एका शिक्षिकेला ही विषबाधा झाली आहे. या सर्वांना मुलुंडमधील अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. डाळ खिचडीतून विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सर्वांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होत आहे. डॉक्टर उषा मोहप्रेकर यांनी रुग्णालयात दाखल सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे. 

Web Title: The poisoning to students in Bhandup Mumbai

टॅग्स