Crime News : फरार आरोपी 'वारीस पंजाब दे' संघटनेचा म्होरक्या अमृतपाल सिंह संदर्भात पोलीसअलर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police alert regarding fugitive accused Waris Punjab De organization leader Amritpal Singh mumbai crime

Crime News : फरार आरोपी 'वारीस पंजाब दे' संघटनेचा म्होरक्या अमृतपाल सिंह संदर्भात पोलीसअलर्ट

मुंबई : फरारी खलिस्तानी समर्थक 'वारीस पंजाब दे' प्रमुख अमृतपाल सिंग यांच्याविरुद्ध पोलिसांनी लुक आऊट सर्कुलर आणि अजामीनपात्र वॉरंट जारी केल्यानंतर महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर दिसत आहे. यानंतर अमृतपाल सिंगच्या शोध मोहिमेसाठी सुरक्षा यंत्रणांनी 6 राज्यात अलर्ट घोषित केला आहे त्यात महाराष्ट्र सुद्धा आहे.

महाराष्ट्रसह 6 राज्यात अलर्ट

फरारी अमृतपाल सिंगच्या शोधासाठी 6 राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्व राज्यातील हॉटेल आणि धर्मशाळांमध्ये पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. काही ठिकाणी वाहनांची तपासणीही केली जात आहे.

अमृतपाल सिंगने आपले स्वरूप बदलले आहे. अशा परिस्थितीत त्याची ओळख पटवण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली जात आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने अमृतपालचा माग काढत आहेत आणि वेळोवेळी त्याच्या नव्या रुपाची छायाचित्रे प्रसिद्ध करत आहेत. जेणेकरून खलिस्तानी समर्थकाला लवकर अटक करता येईल.

अजामीनपात्र वॉरंट जारी

पंजाब पोलिसांनी फरारी खलिस्तानी सहानुभूतीदार 'वारीस पंजाब दे' प्रमुख अमृतपाल सिंग यांच्याविरुद्ध लुकआउट परिपत्रक आणि अजामीनपात्र वॉरंट जारी केले.खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पंजाब पोलिस इतर राज्यातील पोलीस आणि केंद्रीय यंत्रणां बरोबर शोधकार्य करत आहे. अमृतपालच्या एकूण 154 समर्थकांना अटक करण्यात आली असल्याचे पंजाबच्या पोलीसांकडून सांगण्यात आले आहे.

विविध वेशातील छायाचित्रे प्रसिद्ध

अमृतपाल सिंगला अटक करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पंजाब पोलिसांनी त्याची वेगवेगळ्या वेशतील छायाचित्रे जारी केली आहे. एका छायाचित्रात अमृतपाल सिंग क्लीन शेव्हमध्ये दिसत आहे. अमृतपाल सिंग यांची वेगवेगळ्या वेशभूषेतील अनेक छायाचित्रे आहेत. ही सर्व छायाचित्रे आम्ही प्रसिद्ध करत आहोत. पंजाब पोलिसांनी जनतेला अमृतपालला अटक करण्यात मदत करण्याची विनंती केली.

प्राथमिक तपासात पळत असताना अमृतपाल जालंधर जिल्ह्यातील एका गुरुद्वारात गेला आणि कपडे बदलून मोटारसायकलवरून पळून गेला. सीसीटीव्ही फुटेजनुसार, अमृतपाल सिंग 18 मार्च रोजी जालंधरमध्ये चारचाकीमधून पळताना दिसला होता. 'वारीस पंजाब दे'वर कारवाई आणि त्याचा प्रमुख अमृतपाल सिंग आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू असताना, खलिस्तानी नेत्याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या चार आरोपींना जालंधरमधील शाहकोट येथे अटक करण्यात आली मनप्रीत, गुरदीप, हरप्रीत आणि गुरपेज अशी आरोपींची ओळख पटली आहे.