Mumbai Crime News : निर्जनस्थळी मित्रासोबत जाताना मुलींनी विचार करावा पोलिसांचे आवाहन

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे दोघे अटक
Mumbai Crime News
Mumbai Crime Newssakal

डोंबिवली - पोलिस असल्याचे खोटे सांगत चौकशीच्या बहाण्याने मुलीला झाडाझुडपात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना ठाकुर्ली परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चोविस तासात तपास करत दोघांना अटक केली.

विष्णू भांडेकर (वय 25) आणि आशिष गुप्ता (वय 32) अशी अटक आरोपींची नावे आहेत. कल्याण डोंबिवली परिसरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. घडलेल्या घटना पाहता निर्जनस्थळी मित्रांसोबत फिरायला जाताना थोडा विचार करा, सावध व्हा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

डोंबिवली परिसरात राहणारे महाविद्यालयीन तरुण तरुणी शुक्रवारी दुपारी ठाकुर्ली रेल्वे स्थानक जवळील खाडी किनाऱ्यालगत असलेल्या निर्जन स्थळी फिरण्यास गेले होते. दुपारी 3.30 च्या सुमारास त्या ठिकाणी विष्णू व आशिष त्या परिसरात आले. त्यांनी संबंधित तरुण तरुणीस ते पोलिस असल्याचे सांगितले.

तसेच त्यांचे मोबाईल मध्ये काढलेले काही फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची तसेच घरच्यांना दाखविण्याची धमकी दिली. चौकशीच्या बहाण्याने मुलाला व मुलीला त्यांनी वेगळे केले. त्यातील एकाने मुलाला स्टेशन परिसरात नेले व दुसऱ्याने त्या निर्जनस्थळी मुलीला धमकावित तिच्यावर अत्याचार केला.

आमचे साहेब इथे बसले तू त्यांच्याशी बोल, अस सांगत आरोपीने तरुणाला बोलण्यात गुंतवून ठेवले. यावेळी पिडीत मुलाला तिच्या मित्रास फोन करुन पळून जाण्यास सांग असे देखील सांगितले. मैत्रिण पोलिसांच्या तावडीतून सुटल्याचे समजल्याने मित्र स्टेशन परिसरातून निघून गेला. त्यानंतर दुसरा आरोपी निर्जनस्थळी गेला व तेथे थोड्या दूर अंतरावर मुलीला नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

तर पहिला आरोपी हा स्टेशन परिसरात मुलावर पाळत ठेवण्यासाठी गेला. अत्याचार केल्यानंतर दोघांनी त्या परिसरातून पळ काढला. दरम्यान दोघांनी या दरम्यान मोबाईल फोनवर संभाषण सुरु ठेवले होते. मुलीला स्टेशन परिसरात आरोपींनी सोडून दिल्यानंतर मुलीने तिच्या मित्रास घडलेला प्रसंग सांगितला.

त्यानंतर स्टेशन परिसरात ती बराच वेळ बसून होती. काही नागरिकांच्या सांगण्यावरुन ती आरपीएफ पोलिसांकडे गेली व घडलेली घटना सांगितली. विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घटना घडली असल्याने शनिवारी पहाटे विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ व डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णूनगर चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी विष्णूनगर व मानपाडा पोलिसांचे पाच पथक तैनात करत तपास सुरु केला.

पोलिस निरिक्षक मोहन खंदारे, दिपविजय भवर, आंधळे, सहाय्यक पोलीस निरिक्षक अविनाश वनवे, सुनील तारमाळे यांच्या पथकाने तपास केला. पिडीतीने केलेले वर्णन तसेच त्या परिसरातील तांत्रिक बाबी लक्षात घेत पोलिसांनी विष्णू याला नेवाळी नाका व आशिष याला नांदिवली रोड परिसरातील त्याच्या घरातून अटक केली.

यातील आरोपी विष्णू हा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असून दोन तीन महिन्यांपूर्वीच त्याला चोरीच्या घटनेत अटक करण्यात आली होती. ठाकुर्ली परिसरातच त्याने ती चोरी केली होती. जामिनावर सुटका होताच त्याने मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

सदर घटनेत महाविद्यालयीन तरुण हा मैत्रिणीला इंम्प्रेस करण्यासाठी मित्राची दुचाकी घेऊन आला होता. ठाकुर्ली पूर्वेला दुचाकी पार्क करुन ते पश्चिमेला निर्जनस्थळी फिरण्यास गेले होते. याआधीही बावनचाळ परिसरात एका मुलीवर अत्याचार घडल्याची घटना घडली होती. निर्जनस्थळी मुलींना नेऊन त्यांच्यावर अत्याचार होत असल्याने अशा निर्जनस्थळी जाताना मुलींनी विचार करा, सावध व्हा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com