गाडीच्या काचा फोडून आती मुद्देमाल पळविणा-या टोळीस अटक

गाडीच्या काचा फोडून आती मुद्देमाल पळविणा-या टोळीस अटक

ठाणे : रस्त्यावर उभ्या केलेल्या मोटारींच्या काचा फोडून, त्यातील टेपरेकॉर्डर आदी मुद्देमाल लंपास करणाऱ्या टोळीचा छडा ठाणे पोलिसांनी लावला आहे. या कारवाईत तिघांना अटक करून, 16 टेपरेकॉर्डर हस्तगत करण्यात आले आहेत. 

या कारवाईत अटक केलेल्या चोरांपैकी जगन्नाथ सरोज (वय 46), दिनेश कश्‍यप (33) (दोघेही रा. नालासोपारा) अशी दोघांची नावे असून, मुद्देमालाची विक्री करणारा तिसरा आरोपी मुंब्य्रातील आहे. गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट-5 च्या पोलिस पथकाने ही कारवाई केली. मोटारींमधील महागडे टेपरेकॉर्डर ही टोळी काही हजारांत मुंबईच्या चोरबाजारात विकत असे. 

पोलिस तपासात आतापर्यंत तब्बल 43 गुन्ह्यांची उकल झाली आहे. तर, जेमतेम शिक्षण घेतलेल्या या टोळीवर यापूर्वीही 45 गुन्हे दाखल आहेत. आरोपींना ठाणे न्यायालयाने बुधवार (ता. 16)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त दीपक देवराज यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

वागळे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट-5 ने केलेल्या या टोळीच्या चौकशीत त्यांनी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्याचबरोबर ठाणे शहर, मुंबई व उपनगरे, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, पुणे शहर, रत्नागिरी अशा विविध 45 ठिकाणी या आरोपींना अशा प्रकारच्या चोरीच्या गुन्ह्यांत अटक करण्यात आली होती. या टोळीतील एक जण मुंब्य्रातील असून, तो कारटेपची विक्री करण्यास मदत करीत असल्याने त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

43 गुन्ह्यांची कबुली 

या टोळीने शहर आयुक्तालयाच्या हद्दीतील कासारवडवली, चितळसर, कापूरबावडी, वर्तकनगर, वागळे इस्टेट, ठाणे नगर, नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 14 आणि ठाणे ग्रामीण, मुंबई शहर हद्दीतील 29 अशा 43 गुन्ह्यांची कबुली दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com