लाखोंच्या 'एमडी'सह अंधेरीत दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

सुनील धुतिया (वय 42) आणि विकी नाडर (25) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांना अंधेरी येथे सापळा रचून अटक करण्यात आली, अशी माहिती उपायुक्त शिवदीप लांडे यांनी दिली.

मुंबई - अंमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) अंधेरी येथे केलेल्या कारवाईत एक किलो मेफेड्रॉनसह दोघांना अटक केली. या प्रकरणी गुन्ह्यात वापरलेली गाडीही जप्त केली आहे.

सुनील धुतिया (वय 42) आणि विकी नाडर (25) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांना अंधेरी येथे सापळा रचून अटक करण्यात आली, अशी माहिती उपायुक्त शिवदीप लांडे यांनी दिली. 

आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत सुमारे 20 लाख आहे. पोलिस निरीक्षक संतोष भालेकर यांच्या पथकाने अंधेरी पूर्व येथील इन्फॅनिटी मॉलजवळ सापळा रचला होता. त्या वेळी नाडरने धुतिया याच्याकडील एमडीची तपासणी करून खरेदी केल्यानंतर एएनसीच्या पोलिसांनी दोघांनाही अटक केली. एअर कार्गोच्या माध्यमातून अंमली पदार्थ परदेशात पाठविण्यात येत असल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, धुतिया एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याची चर्चा आहे. 

Web Title: police arrested mephedron dealer