सराफाचे दुकान लुटणाऱ्यांना अटक

सराफाचे दुकान लुटणाऱ्यांना अटक

मुंबई - माहीम येथील वृद्ध सराफाला मारहाण करून परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरसह सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखेच्या कक्ष-5च्या पोलिसांनी अटक केली. राणा राम पुरोहित (21), पुकराज पिल (21) अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून, याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

बुधवारी (ता. 2) दुपारी 3 च्या दरम्यान मोरी रोड येथील अभिषेक ज्वेलर्समध्ये अचानक आलेल्या लुटारूंनी वयोवृद्ध दुकानमालकाला मारहाण करून त्यांचे हात-पाय बांधले. त्यानंतर दुकानातील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम परवानाधारक रिव्हॉल्व्हर असा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी माहीम पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता; मात्र या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेने करण्यास सुरुवात केली होती. पथकाला यातील आरोपी वसई येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने सापळा लावून दोघा आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून साडेसहा किलो सोन्याचे दागिने, साडेनऊ किलो चांदीचे दागिने, सात लाख 86 हजार 95 रुपये रोख व 6 काडतुसांसह परवानाधारक रिव्हॉल्व्हर असा एकूण 1 कोटी 90 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. 

कर्मचाऱ्यानेच रचला होता कट 
ज्वेलर्सच्या दुकानात नोकर म्हणून कामाला राहिलेल्या आरोपीने मालकाला आपले खोटे नाव सांगून दुकानात काम मिळवले होते. त्यानेच या लुटीचा कट रचल्याचे उघड झाले आहे; मात्र तक्रारीत 84 लाख 63 हजारांच्या ऐवजाची चोरी झाल्याचे म्हटले असून, पोलिसांनी आरोपींकडून 1 कोटी 90 लाखांचा ऐवज जप्त केल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com