पोलिसाची शेतकऱ्याला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

वाडा : वाडा तालुक्‍यातील बिलोशी गावात रिलायन्स गॅस लाईनच्या कामात शेतकऱ्यांनी अडथळा आणला. या वेळी शेतकरी व पोलिसांत जोरदार बाचाबाची झाली. या दरम्यान पोलिसाने शेतकऱ्याला श्रीमुखात लगावल्याने वातावरण तंग झाले आहे. या वेळी सरकारी कामात अडथळा आणल्याने 15 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली. अन्य 20 ते 25 जणांचा पोलिस शोध घेत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने रिलायन्स गॅसलाईनचे बिलोशी गावातील पाईपलाईन झाकण्याचे काम शनिवारी सुरू करण्यात आले; मात्र या ठिकाणी काही शेतकरी कामात अडथळा आणून आपल्या मागण्या मांडत होते; मात्र या वेळी पालघर अतिरिक्त पोलिस अधीक्षक योगेश चव्हाण व अन्य अधिकारी शेतकऱ्यांसोबत चर्चा करीत असताना बाचाबाची झाली. यातून झालेल्या वादात पोलिसांनी जवळपास 15 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याची घटना घडली आहे. यात महिलांचाही मोठा सहभाग असून, अन्य अज्ञातांचा पोलिस शोध घेत आहेत. 

दरम्यान, आमचे बाधित लोक हक्क मागत असताना पोलिस अधिकाऱ्यांनी आमच्या नातेवाइकांच्या श्रीमुखात मारली. ज्यामुळे वाद निर्माण झाला व त्यानंतर जमलेल्या पोलिसांच्या फौजफाट्याने आमच्या लोकांना पोलिसांच्या वाहनांमध्ये कोंबले, अशी माहिती अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्याच्या नातेवाइकाने दिली. याशिवाय व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्येदेखील पोलिस अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीच्या श्रीमुखात दिल्याचे स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, घडलेल्या या प्रकाराची व प्राप्त असलेल्या व्हिडीओची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ताब्यात असलेल्या आरोपींच्या नातेवाइकांनी केली आहे.  

Web Title: The police beat the policeman