पोलिस हवालदाराचा जामीन अर्ज नामंजूर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

उल्हासनगर येथील 19 वर्षांच्या युवकाला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप असलेल्या पोलिस हवालदाराचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने गुरुवारी नामंजूर केला. या तरुणाला खंडणीसाठी धमकावल्याचा आरोप पोलिस हवालदारावर ठेवण्यात आला आहे.

मुंबई - उल्हासनगर येथील 19 वर्षांच्या युवकाला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप असलेल्या पोलिस हवालदाराचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने गुरुवारी नामंजूर केला. या तरुणाला खंडणीसाठी धमकावल्याचा आरोप पोलिस हवालदारावर ठेवण्यात आला आहे.

उल्हासनगर येथे सॅंडविच आणि ज्यूस विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या युवकाकडून पोलिस हवालदार पवन केदार वारंवार पैशांची मागणी करीत होता. केदारने या युवकाकडे खंडणी मागितली; मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिला होता. त्यामुळे केदारने त्याला काही दिवसांपूर्वी पोलिस ठाण्यात नेऊन खोट्या तक्रारीत अडकवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर या युवकाने घरी जाताना आत्महत्या केली, असे त्याच्या भावाने पोलिस फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी केदार याने उच्च न्यायालयात केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Bell Reject Crime Court