घरफोडी करणाऱ्या सराईताला ठोकल्या बेड्या

दिनेश गोगी
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

उल्हासनगर : नागरिकांच्या कामावर जाण्याच्या वेळेवर लक्ष ठेऊन, नागरिक घराबाहेर पडताच त्यांच्या फ्लॅटचे दरवाजे शिताफीने उघडून घरातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या सराईत गुन्हेगारास उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 113 ग्राम वजनाचे सोन्याच्या दागिन्यांसह गुन्हे करताना वापरण्यात येणारी मारुती स्विफ्ट कार असा 5 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. उल्हासनगर पोलिस परिमंडळ 4 च्या हद्दीतील बदलापूर, अंबरनाथ परिसरात राहणारे नागरिक कामावर जाताच, त्यांच्या घरातील दागिन्यांवर डल्ला मारण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. 

याप्रकरणी नागरिकांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रारी देखील केलेल्या होत्या. या प्रकारावर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण वॉच ठेवून असताना स्विफ्ट कार मधून येणारी चौकडी हे गुन्हे करत असल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त (गुन्हे) दीपक देवराज, सहाय्यक पोलिस आयुक्त बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, पोलिस निरीक्षक मनोहर पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज सालगुडे, श्रीकृष्ण नावले, उपनिरीक्षक गणेश तोरगल, सहाय्यक उपनिरीक्षक उदय पालांडे, राजकुमार सौदागर, सुरेंद्र पवार, भरत नवले, पाटील आदींनी बदलापूरात सापळा संशयास्पद रित्या स्विफ्ट कार मधून फिरणाऱ्या कैलास मोरे याला ताब्यात घेतले. 

कारची झडती घेतली असता, त्यामधून सुमारे साडेतीन लाख रुपयांचे 113 ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे.
 कैलास मोरे हा घरफोडी करण्यात तरबेज असून तो त्याच्या तीन साथीदारांच्या मदतीने नागरिक कामावर जाताच, त्याच्या घरातील दागिने, रोख रकमेवर डल्ला मारत होता. त्याच्यावर विविध शहरातील 11 पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. नुकताच तो दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या गुन्ह्यात धुळे ऑर्थररोड जेल मधून बाहेर आला होता. अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.

Web Title: police catch Burglar thief in ulhasnagar