आमदार प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात पोलीस तक्रार

कार्यक्रमात चितावणीखोर भाषण केल्याप्रकरणी एका माजी नगरसेवकानं सुर्वे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
Police complaint against shiv sena rebel MLA Prakash Surve offensive speech mumbai
Police complaint against shiv sena rebel MLA Prakash Surve offensive speech mumbaisakal

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांच्याविरोधात दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका कार्यक्रमात चितावणीखोर भाषण केल्याप्रकरणी एका माजी नगरसेवकानं सुर्वे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. संबंधित चितावणीखोर भाषणाचा व्हिडीओही पोलिसांना देण्यात आला आहे. बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांनी 14 ऑगस्टला एका कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना संबोधित करताना चितावणीखोर भाषण केलं आहे. मागोठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी दहिसर कोकणीपाडा बुद्धव विहार येथील कार्यक्रमात प्रक्षोभक आणि चिथावणीखोर भाषणावर आक्षेप घेत शिवसेनेचे माजी नगरसेवक उदेश पाटेकर यांनी दहिसर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे.

कायदा, सुव्यवस्था, लोकशाही संविधान यांचे धिंडवडे करणाऱ्या या आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं पोलिसांकडे केली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील या प्रकरणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे. त्यांच्या भाषणातील काही भाग व्हायरल होत आहे. त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, “ह्यांना यांची जागा दाखवल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. कुणाचीही दादागिरी खपवून घ्यायची नाही. कुणी आरे केलं तर त्याला कारे करा. प्रकाश सुर्वे इथे बसलाय… त्यांना ठोकून काढा. हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा. दुसऱ्या दिवशी जामीन करून देतो, त्याची तुम्ही चिंता करू नका” अशा आशयाची विधानं सुर्वे यांनी आपल्या भाषणात केली आहेत. ते मागाठाणे मतदारसंघाचे आमदार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com