मुख्यमंत्र्यांच्या फार्महाऊसमध्ये घुसणाऱ्या तिघांना पोलिस कोठडी; परिसरातील बंदोबस्तात वाढ; तिघांची कसून चौकशी सुरू

महेंद्र दुसार | Thursday, 10 September 2020

खालापूर तालुक्यातील भिलवले येथील  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे.

अलिबाग : खालापूर तालुक्यातील भिलवले येथील  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. फार्महाऊस परिसरात आता पोलिस बंदोबस्त वाढवला असून ताब्यात घेतलेले तिघेजण रिपब्लिक न्यूज चॅनेलचे कर्मचारी असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिली आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

कंगनाच्या बंगल्यावर आकसाने कारवाई नाही; मुंबई महापालिकेचे न्यायालयात स्पष्टीकरण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ निवासस्थान उडवून देण्याची धमकी आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा चांगली अलर्ट झाली आहे. खालापूर तालुक्यातील भिलवलेकडे जाणाऱ्या मार्गावर संशयितांची तपासणी करून सोडण्यात येत आहे. या परिसरात अनेक फार्म हाऊस आहेत. मंगळवारी (ता. 8) संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास टुरिस्ट कारने आलेल्या तिघानी बंगल्याची रेकी केल्याची तक्रार फार्महाऊसच्या सुरक्षा रक्षकाने केली होती. तसेच, तक्रारदार सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली, असाही आरोप तिघांवर आहे.

कंगनाचा विषय आमच्यासाठी संपला; संजय राऊतांचा सूर नरमला

या तिघांना खालापूर दिवाणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता. 14) पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या तिघांची कसून चौकशी सुरू असून त्यांच्या या कृत्याची सत्यता पडताळण्यात येत असल्याचे पारसकर यांनी सांगितले. या दरम्यान, खालापूर आणि फार्महाऊसवरील पोलिसांची कुमक आणि दंगल नियंत्रण पथकाचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

--------------------

जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक करतो महापालिका शाळांचे सॅनिटायझेशन

कोल्हापूर ः कोरोना काळात माणसं माणसांपासून लांब होत गेली. बाधित असल्याच्या संशयावरून काही ठिकाणी काही लोकांना दगड मारून परिसरातून बाहेर काढण्याचे प्रकारही घडले. पण, आता महापालिकेच्या सर्व शाळांचे स्वखर्चाने सॅनिटायझेशन करण्याचा संकल्प एका शिक्षकाने केला आहे आणि विशेष म्हणजे हा शिक्षक "झेडपी'च्या शाळेतील आहे. हेरले (ता. हातकणंगले) येथील व्दारकानाथ भोसले असं या शिक्षकाचे नाव. गेल्या एका महिन्यात त्यांनी महापालिकेच्या चार शाळांचे सॅनिटायझेशन पूर्ण केले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांचे सॅनिटायझेशनही ते करणार आहेत.