शालेय शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक; प्राचार्यांविरोधात गुन्हा

police fir
police firsakal media

मुंबई : शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांना सापत्नपणाची वागणूक (Treated not well) देत त्यांना वर्गाबाहेर उभे केल्याने कांदिवली पश्चिम येथील कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या रेश्मा हेगडे (Principal reshma hegde) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल (fir filed) करण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha gaikwad) यांनी दिली. तसाच प्रकार करणाऱ्या पुण्यातील युरो स्कूलबाबत (Pune Yuro school) पुण्याच्या उपसंचालकांनी भेट देऊन चौकशी केली असून शाळेला नोटीस बजावली असल्याचेही त्यांनी आज सांगितले.

police fir
पालघरमधील महसूल विभागाचा कारभार ठप्प; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका

विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या त्रास देणाऱ्या अथवा त्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या शैक्षणिक संस्थांची गय केली जाणार नसल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले. कपोल विद्यानिधी स्कूल आणि युरो स्कूलमध्ये शुल्क भरले नसल्याने विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर उभे केले जात होते. इतर विद्यार्थ्यांसमोर अपमानित करून मानसिक त्रास दिला जात होता. त्यासाठी पालकांकडून अनेक प्रकारच्या तक्रारी आल्याने शालेय शिक्षण विभागामार्फत त्याची तातडीने दखल घेण्यात येऊन प्राचार्य रेश्मा हेगडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून युरो स्कूलला नोटीस बजावण्यात आली आहे.

आदेशाचे उल्लंघन

कोविडसंदर्भातील निर्बंधांमुळे यंदा शैक्षणिक अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यात आला. कोविडमुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्या काळात शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी काही विद्यार्थ्यांना विलंब झाला. एकंदरीत परिस्थिती विचारात घेऊन विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या आधार द्यावा आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले होते; मात्र ते डावलून काही शाळांनी शुल्कवसुलीसाठी विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक देणे, वर्गाबाहेर उभे करणे, मानसिक त्रास देणे आदी प्रकार सुरूच ठेवले होते. त्याची गंभीर दखल आता शिक्षण विभागाने घेतली असल्याचेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com