चेन्नई एक्स्प्रेसममध्ये विसरलेली बॅग पोलिसांनी शोधली

चेन्नई एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एक प्रवासी गाडीतून उतरण्याचा गडबडीत बॅग विसरली. या बॅगेत लाखभर रूपांचे मौल्यवान वस्तू होते.
Maharashtra Police
Maharashtra PoliceSakal
Summary

चेन्नई एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एक प्रवासी गाडीतून उतरण्याचा गडबडीत बॅग विसरली. या बॅगेत लाखभर रूपांचे मौल्यवान वस्तू होते.

मुंबई - चेन्नई एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एक प्रवासी गाडीतून उतरण्याचा गडबडीत बॅग विसरली. या बॅगेत लाखभर रूपांचे मौल्यवान वस्तू होते. या संदर्भातील माहिती मिळताच कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ गाडी तपास करून विसरलेली बॅग पुन्हा शोधून काढली. ओळक पटवून सदरची बॅग प्रवाशांचा ताब्यात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रविवारी आर्यन शंकर मिश्रा हा तरुण चेन्नई एक्सप्रेसने मुंबईत आला. मात्र, गाडीतून उतरण्याचा गडबडीत बॅग गाडीतच विसरला. या बॅगेत त्यांचे अनेक महत्वपूर्ण सामान होते. या संदर्भातील आर्यनने रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर कुर्ला रेल्वे पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर, सदरची गाडी चेक केली असता सदरील बॅग मिळून आली. सापडलेल्या बॅगमध्ये एक 40 हजार रुपये किमतीचा एक आय प्याड, 45 हजार रुपये किमतीचा एक आय फोन, एक कोटक महिद्रा बँकेचा 37 हजार 432 किमतीचा चेक अस्या वस्तू मिळून आले. त्यांनतर पोलिसांनी आर्यन शंकर मिश्रा यांना बॅग सापडल्याची माहिती दिली. त्याची खात्रीशीर चौकशी करून ओळक पटवून सदरची बॅग त्यांच्या ताब्यात दिली. आर्यन याने रेल्वे पोलिस प्रशासन व कुर्ला रेल्वे पोलिस ठाणे यांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com