पोलिसांना मोफत लोकल प्रवास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

मुंबई - मुंबई पोलिस दलातील कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना लवकरच लोकलमधून मोफत प्रवास करता येणार आहे. त्यासाठी या महिनाअखेरपर्यंत मुंबई पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलादरम्यान सामंजस्य करार होणार आहे. हा करार एक वर्षासाठी असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पश्‍चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन रोड स्थानकात काही दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई पोलिस आयुक्त आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यादरम्यान कर्तव्यावर असलेल्या मुंबई पोलिसांना लोकलमधून मोफत प्रवासाची मुभा देण्यात यावी, या विषयावर चर्चा झाली होती. 

लोकल प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा, या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. आपत्कालीन स्थितीत प्रवाशांना या पोलिसांची मदत होईल, हा त्यामागील विचार आहे. लोकल प्रवास करतेवेळी हे पोलिस गणवेशात असणे गरजेचे असेल. त्यांना कोणत्या डब्यांतून प्रवास करण्याची मुभा असेल, हे अद्याप निश्‍चित झाले नाही. सध्या रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत मध्य व पश्‍चिम रेल्वेच्या महिला डब्यांमध्ये लोहमार्ग पोलिस तैनात असतात.

Web Title: police free local travel