आठ दिवसात आरोपीला पकडण्यात टोकावडे पोलिसांना यश

नंदकिशोर मलबारी
रविवार, 24 जून 2018

सरळगांव : ठाणे - कल्याण-  अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कूजलेल्या अवस्थेत व कोणताही पुरावा हाताशी नसतानाही फक्त आठ दिवसाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळवण्यात टोकावडे पोलिस ठाण्याला यश आले आहे. 

सरळगांव : ठाणे - कल्याण-  अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कूजलेल्या अवस्थेत व कोणताही पुरावा हाताशी नसतानाही फक्त आठ दिवसाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळवण्यात टोकावडे पोलिस ठाण्याला यश आले आहे. 

नुकताच या पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन मिळाल्याचा आनंद पोलिस ठाणे साजरा करत असतानाच कोणताही पुरावा नसताना व मृत देह पूर्णपणे कूजलेल्या अवस्थेत असलेल्या मृत व्यक्तीचा मारेकरी शोधण्याची जबाबदारी टोकावडे पोलिसांनी स्विकारली होती. योग्य तपासाच्या आधारावर मृत व्येक्तीची हत्या करणा-या आरोपीचा शोध घेऊन आरोपीच्या मुसक्या आवळण्यास टोकावडे पोलिस ठाण्यास यश आल्याने सह पोलिस निरीक्षक धनंजय पोरे व त्यांच्या सहकार्यांचे कौतूक होत आहे. या घटने बद्दल माहीती देताना पोलिस निरक्षक पोरे यांनी सांगितले कि, या पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कोचरे या गावाच्या हद्दीत कूजलेल्या अवस्थेत एक बाॅडी पडलेली असल्याची खबर (14 जुन) पोलिस पाटील हरिचंद्र पडवळ यांनी टोकावडे पोलिस ठाण्यात दिली. या खबरी वरून पोलिस निरक्षक पोरे व उपनिरीक्षक सागर चव्हाण यांनी आपल्या सरकाऱ्यांना बरोबर घेऊन घटना स्थळ गाठले. या ठिकाणी मयत इसमाचे निरीक्षण केले असता त्याच्या गालावर व डोक्यावर रक्त गोठल्याचे निदर्शनास आले. या मृत देहाचे टोकावडे ग्रामीण रूग्णालयात पोस्ट मार्टम केले असता या इसमाचा मृत्यू डोक्यात मार लागल्याने झाला असल्याचा अहवाल डाॅक्टरांनी दिल्याने टोकावडे पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली.

मृतदेह पूर्णपणे कूजलेल्या अवस्थेत असल्याने प्रतम त्या मृत इसमाची ओळख पेटवणे गरजेचे होते. यासाठी पोलिस निरक्षतक पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम सूरू केली. या परिसरात तपास केला जात असताना टोकावडे गावा जवळील नागवाडी येतील एक इसम चार दिवस झाले तरी घरी आला नाही अशी माहीती मिळाली. या इसमाच्या नातेवाइकांचा शोध घेऊन मृत व्यक्तीचे फोटो दाखविले असता तो अंकू उर्फ पिन्ट्या वामन असवले असल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपास केला असता मृत व्यक्ती गुरुनाथ जानू हिलम यांच्या बरोबर (12 जुन) शहापुर तालुक्यातील किन्हवली येथे दारू पिण्यासाठी गेला होता हे निष्पन्न झाले. या ठिकाणा वरून ते दोघे कोचरे येथे गेले. या ठिकाणी मयताने आरोपीला आई वरून शिवी दिली .याचा राग आरोपीला आल्याने त्यांने मयताच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करून पसार झाला. अखेर पोलिसांनी त्याचा तपास करून त्याला अटक केली असल्याचे सांगितले.
 

Web Title: Police have succeeded to catch the culprit in eight days