पोलिसांच्या मदतीला साठीचा तरुण!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

मुंबई  - दक्षिण मुंबईतील भेंडीबाजार, मोहम्मद अली रोड आदी परिसर रमजाननिमित्त नेहमीच गजबजलेला असतो. खवय्यांच्या होणाऱ्या गर्दीत कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मुंबई पोलिसही डोळ्यात तेल घालून दक्ष असतात. यंदाच्या जल्लोषात साठ वर्षांचे मोहम्मद फारूक कुरेशी नवतरुणाच्या उत्साहाने त्यांच्या मदतीसाठी उतरले आहेत. गळ्यात सात किलोचा मेगाफोन घेऊन ते मोहम्मद अली रोड, भेंडीबाजार, पायधुनी आदी परिसर पिंजून काढत असून सुरक्षेबाबत आवाहन करीत आहेत.

रमजाननिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. महिन्याभरापासून अतिरिक्त आयुक्त (दक्षिण प्रादेशिक विभाग) प्रवीण पडवळ यांच्यासह पोलिस अधिकारी भेंडीबाजार, मोहम्मद अली रोड आदी भागांत तळ ठोकून आहेत.

साध्या वेशातील पोलिसांनी सहा चोरट्यांना रंगेहाथ पकडल्याचेही सांगण्यात आले. मोहम्मद फारूक कुरेशी मूळचे गुजरातचे रहिवासी. दिवसभर काम केल्यानंतर रात्री ८ ते पहाटे ३ वाजेपर्यंत ते मेगाफोनवरून वाहतूक कोंडी आणि सुरक्षेबाबत मार्गदर्शन करीत आहेत. मोबाईल-पर्स चोरट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करीत असतात. गर्दीत हरवलेल्या मुलांबाबतही ते सूचना देत तीन किलोमीटर अंतर फिरतात. त्यानंतर पहाटेच्या सुमारास सहेरीची आठवण करून देण्याकरिता ते परिसरात फिरून मेगाफोनवर सूचना करतात.

मेगाफोनचा आवाज ऐकून अनेक जण सहेरीकरिता जागे होतात. हे काम म्हणजे ईश्‍वराची सेवाच आहे, असे त्यांनी सांगितले.

छेडछाड रोखण्याकरता कार्यकर्ते सज्ज
रमजानदरम्यान पोलिसांनी सहा चोरट्यांना रंगेहाथ पकडल्याची नोंद आहे. जागोजागी बंदोबस्त ठेवल्यामुळे सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या नसल्याचे पायधुनी पोलिसांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे महिला छेडछाडीचे प्रकार रोखण्याकरिता स्थानिक कार्यकर्त्यांची फौजही तैनात आहे. महिला छेडछाडीचे प्रकार रोखण्याकरिता ठिकठिकाणी कार्यकर्ते तैनात केल्याचे सामाजिक कार्यकर्ते राजू भाई यांनी सांगितले.

Web Title: police help by old man ramjan