'त्या' गरोदर महिलेसाठी पोलिस ठरले देवदूत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

सहाय्यक उपनिरीक्षक पवार,पोलिस हवालदार मोकल, हवालदार यादव, पोलिस नाईक रोकडे, पोलिस शिपाई  स्वामी,पोलिस शिपाई लालगे, महिला पोलिस शिपाई भोईर,महिला पोलिस शिपाई पानसरे यांच्या पथकाने माणूसकीचे दर्शन दाखवून तात्काळ महिलेला राजावाडी रुग्णालयात नेले.

मुंबई : घाटकोपर पूर्व येथे प्रसुती वेदना सहन करत पडलेल्या निराधार महिलेसाठी पोलिस देवदुतासारखे धावले. पोलिसांनी तात्काळ महिलेला रुग्णालयात नेल्यामुळे आज बाळ व बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत. 

शुक्रवारी मध्यरात्री मुंबई पोलिस दलाच्या नियंत्रण कक्षाला आलेल्या दूरध्वनीत एक निराधार महिला गर्भवती असून तिची प्रकृती खालावल्या असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी याबाबत स्थानिक पंतनगर पोलिसांना याबाबतची माहिती दिली असता तेथे कार्यरत पोलि निरीक्षक रेणुका बुवा व त्यांच्या पथकाने तात्काळ देरासार लेन परिसराच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी तेथे आंबा ही महिला प्रसुती वेदना सहन करत पडलेली होती.

तिची स्थिती पाहून सहाय्यक उपनिरीक्षक पवार,पोलिस हवालदार मोकल, हवालदार यादव, पोलिस नाईक रोकडे, पोलिस शिपाई  स्वामी,पोलिस शिपाई लालगे, महिला पोलिस शिपाई भोईर,महिला पोलिस शिपाई पानसरे यांच्या पथकाने माणूसकीचे दर्शन दाखवून तात्काळ महिलेला राजावाडी रुग्णालयात नेले. त्यानंतर मध्यरात्री दीडच्या सुमारास ही महिला प्रसुत होऊन मुलगा झाला. पोलिसांनी दाखवलेल्या माणूसकीमुळे दोन जीव वाचल्यामुळे स्थानिक नागरीकांकडून पंतनगर पोलिसांचे कौतुक केले जात आहे

Web Title: police help womens in Mumbai