पोलिसांच्या घरांची सोडत पुढे ढकलली

पोलिसांच्या घरांची सोडत पुढे ढकलली

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) कोकण मंडळाकडून मुंबई पोलिसांसाठी विरार बोळिंज येथील १८६ सदनिकांची सोडत प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत पालघर पोलिस जिल्हा अधीक्षकांनी म्हाडाला पत्र पाठवून विनंती केली. त्यामुळे ही सोडत पुढे ढकलण्यात येत असल्याचे कोकण मंडळाचे सभापती बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. 

विरार बोळिंज येथील १८६ घरांची सोडत २७ नोव्हेंबरला होणार असल्याचे म्हाडा प्रशासनाने यापूर्वी जाहीर केले होते. परंतु, राज्यातील राजकीय परिस्थिती विचारात घेता पोलिस अधीक्षकांनी प्रशासकीय कारण देत ही सोडत पुढे ढकलण्याची विनंती म्हाडा प्रशासनाला केली. हे पत्र मिळाल्यावर म्हाडाच्या कोकण मंडळाने सोडत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत केंद्र सरकारने नवीन योजना राबवली आहे. त्यानुसार २०२२ पर्यंत पोलिसांना मालकीची घरे देण्याचे म्हाडा प्रशासनाने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, या घरांच्या किमती कमी असतील. केंद्र सरकारची २०२२ पर्यंत सगळ्यांसाठी घरे ही महत्त्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबवण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. 

web title : police houses lottery postponed​

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com