खड्डयात पडून पोलिस जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

संजय गांधीनगर रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळल्याने उल्हासनगर सीआयडी ब्रॅंचचे (गुप्तवार्ता विभाग) पोलिस नाईक राजेश निकम जखमी झाले.

उल्हासनगर ः सोमवारी दुचाकी खड्ड्यात पडून पोलिस जखमी झाल्याची घटना घडली. यापूर्वीदेखील येथे अशा अनेक घटना घडल्या आहेत. संजय गांधीनगर रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळल्याने उल्हासनगर सीआयडी ब्रॅंचचे (गुप्तवार्ता विभाग) पोलिस नाईक राजेश निकम जखमी झाले. यात त्यांच्या पायाला दुखापत झाली असून उपचारासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे दोन दिवसांपूर्वी वकील मोनिष भाटिया हे देखील दुचाकीवरून खड्डयात पडून जख्मी झाले होते; तर काही महिन्यांपूर्वी अपंग सेवा संघाचे अध्यक्ष भरत खरे हे दुचाकीवरून खड्ड्यात पडून त्यांच्या मेंदूला मार लागला होता. या अपघातामुळे काही दिवसांनी त्यांचे निधन झाले. अंबरनाथमध्येही मागच्या आठवड्यात वाहतूक पोलिस संजय पाटील यांचा अड्ड्यात दुचाकी आदळल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police injured in a ditch