भिवंडीत काँग्रेसकडून पोलिसांची दिशाभूल! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

ग्रेसच्या पुढाऱ्यांनी पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती देऊन राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे खोटी फिर्याद देणाऱ्या काँग्रेस पुढाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांकडून होत आहे.

भिवंडी : भिवंडी महापालिकेतील काँग्रेस नगरसेवक हरवले आहेत, अशी लेखी तक्रार काँग्रेसचे शहराध्यक्ष व पालिकेतील गटनेते यांनी भिवंडी पोलिस उपायुक्तांकडे केली होती. उपायुक्तांच्या आदेशानुसार पोलिस पथकाने विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या नगरसेवकांच्या घरी जाऊन चौकशी केली असता काही नगरसेवक व नगरसेविका पोलिसांना त्यांच्या घरी सुरक्षित असल्याचे आढळून आले. काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती देऊन राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे खोटी फिर्याद देणाऱ्या काँग्रेस पुढाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांकडून होत आहे.

भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक ५ डिसेंबरला होणार असल्याने कोणार्क आघाडी व काँग्रेसच्या उमेदवारांनी संख्याबळासाठी भाजप व समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पक्ष (एकतावादी गट) अशा विविध पक्षांच्या नगरसेवकांना पंचातारांकित हॉटेलमध्ये नेऊन ठेवले होते. महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे बहुसंख्य नगरसेवक हे कोणार्क आघाडीच्या तंबूत गेल्याने काँग्रेसच्या एका गटात भीतीचे वातावरण होते. आपला पराभव होऊ नये, यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष शोएब (गुड्डू) खान, पालिकेचे गटनेते हलीम अन्सारी यांनी काँग्रेसचे १८ नगरसेवक हरविल्याची तक्रार पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्याकडे केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police mislead Congress!