सोशल मीडियावर पोलिसांची नजर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

मुंबई -सोशल नेटवर्किंग साईटवर होणाऱ्या निवडणूक अपप्रचारावर मुंबई पोलिस करडी नजर ठेवणार आहेत. आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांना पोलिस ठाण्याची वारी करावी लागेल. 

निवडणुकीसाठी मुंबई पोलिसांनी खास कक्ष सुरू केला आहे. निवडणूक काळात पोलिस ठाण्यातून मिळणारी माहिती या कक्षाद्वारे निवडणूक आयोगाला पाठवली जाणार आहे. पोलिस उपायुक्त राजेंद्र दाभाडे हे या कक्षाचे प्रमुख आहेत. या कक्षात 16 अधिकारी तैनात असतील. 

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास आणि अपप्रचार केल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस सहआयुक्त देवेन भारती यांनी "सकाळ'ला सांगितले. 

निवडणूक काळात उमेदवार सोशल मीडियावर कसा प्रचार करतात, त्यासाठी ते खर्च करतात का, यावरही पोलिस लक्ष ठेवतील. त्यांच्या खर्चाची माहिती पोलिस निवडणूक आयुक्तांना देतील. निवडणूक आयुक्त ती प्राप्तिकर विभागाकडे पाठवतील. कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीने संवेदनशील मतदान केंद्राची माहिती पोलिस जमा करत आहेत. 

Web Title: Police to monitor social media