पोलिसांनी आपल्या आरोग्याबाबत सजग राहण्याची गरज 

संजीत वायंगणकर
गुरुवार, 29 मार्च 2018

डोंबिवली - तणावपूर्ण व धावपळीच्या युगात चोवीस तास 'ऑन ड्युटी' असणाऱ्या पोलिसांचे आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असते. तणाव मुक्ततेसाठी व्यसनांना जवळ करण्याचा पर्याय शोधण्याचे प्रमाण यामुळे वाढले आहे. त्याचा विपरित परिणाम सर्वांवरच होतो. त्यातच पोलिसांना कामाच्या विविध वेळेमध्ये आहाराचे नियंत्रण राखताना अनेक समस्या उद्भवतात. त्यासाठी पोलिसांनी संतुलित आहार घ्यावा. तणाव कमी करण्यासाठी जर पोलिस व्यसन करत असतील तर ते योग्य नाही. त्याऐवजी सकस आहार घेतल्यास त्याचा फायदा नक्कीच चांगला होतो. त्यामुळे व्यसनाऐवजी सकस व वेळेवर आहार घेण्यावर पोलिसांनी भर दिला पाहिजे.

डोंबिवली - तणावपूर्ण व धावपळीच्या युगात चोवीस तास 'ऑन ड्युटी' असणाऱ्या पोलिसांचे आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असते. तणाव मुक्ततेसाठी व्यसनांना जवळ करण्याचा पर्याय शोधण्याचे प्रमाण यामुळे वाढले आहे. त्याचा विपरित परिणाम सर्वांवरच होतो. त्यातच पोलिसांना कामाच्या विविध वेळेमध्ये आहाराचे नियंत्रण राखताना अनेक समस्या उद्भवतात. त्यासाठी पोलिसांनी संतुलित आहार घ्यावा. तणाव कमी करण्यासाठी जर पोलिस व्यसन करत असतील तर ते योग्य नाही. त्याऐवजी सकस आहार घेतल्यास त्याचा फायदा नक्कीच चांगला होतो. त्यामुळे व्यसनाऐवजी सकस व वेळेवर आहार घेण्यावर पोलिसांनी भर दिला पाहिजे. तसेच दिवसाला निश्चित वेळी व्यायाम केल्यास त्याचे फायदे चिरकाल टिकतील, असे आवाहन आयुर्वेदतज्ञ डॉ. मंगेश देशपांडे यांनी केले.

'आरोग्यावर बोलू काही' या विषयावर डोंबिवली रामनगर पोलिस ठाण्याच्या जागेत पोलिसांचे आरोग्य विषयक दुर्लक्ष, त्यासाठी त्यांनी घ्यायची काळजी या विषयावर ते मार्गदर्शन करत होते. रोटरी क्लब मिडटाऊन, डोंबिवली रामनगर पोलीस यांच्यातर्फे आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिर मंगळवारी आयोजित केले होते. या शिबिरात कायदेतज्ज्ञ अॅड. शिरीष देशपांडे, डॉ. देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.

ते म्हणाले की, ताणतणावामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. तसेच प्रत्येक व्यक्तीने सुखी जीवन जगायचे असेल तर आहार वेळेवर घेणे, नियमित व्यायाम, तेलकट व तिखट पदार्थांचे सेवन टाळावे. आरोग्य हिच आपली संपत्ती आहे. 

या कार्यक्रमाला रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजयसिंग पवार, यांच्यासह अधिकारी-कर्मचारी वर्ग, मिडटाऊनचे अध्यक्ष नितीन शेंबेकर, रोटेरिअन प्रकाश सिनकर, अॅड. अनिलकुमार बाविस्कर, मिडटाऊन रोटरीयन सदस्य उपस्थित होते. शिबिराच्या शुभारंभाला वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंग पवार यांनी पोलिस ठाण्यातर्फे उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन मिडटाऊनचे अध्यक्ष नितीन शेंबेकर यांनी केले.रोटरियन बापू वैद्य यांनी या आरोग्य जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले.

Web Title: The police need to be cautious about their health