पोलिस निरीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

मुंबई - गुन्ह्यातून आरोपीची सुटका करण्यासाठी तीन लाखांची लाच मागण्याच्या आरोपाखाली देवनार पोलिस ठाण्यातील निरीक्षक दत्तात्रय गोविंद चौधरी (50) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी (ता. 13) पकडले. आरोपीकडून लाचेचा पहिला हप्ता घेताना त्याला अटक केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

तक्रारदार आणि त्याच्या भावाला न्यायालयाने जामीन मंजूर केला. या प्रकरणातून त्यांना बाहेर काढण्यासाठी चौधरीने तीन लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास या प्रकरणात अडकवण्याची धमकी त्याने दिल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून चौधरीला पकडले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Officer Arrested by ACB in Bribe case Crime