भांडण सोडवण्यास गेलेल्या पोलिस अधिकाऱ्याला बदडले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

ठाणे : रस्त्यावर सुरू असलेली दोघा व्यक्तींची आपापसातली भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यालाच बदडल्याची घटना ठाण्यात शुक्रवारी (ता. 30) मध्यरात्री घडली. यात नौपाडा पोलिस ठाण्याचे अधिकारी नीलेश मोरे हे जखमी झाले असून मारहाण करणाऱ्या दोघा मद्यपी व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 

महेश गोपाळ शेट्टी (43) रा. घोडबंदर आणि वैकुंठनाथ जैसवाल (35) रा. भास्कर कॉलनी, नौपाडा अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी मध्यरात्री हरीनिवास सर्कल जवळील एका बारच्या समोर शेट्टी याचे एका अनोळखी व्यक्तीशी भांडण सुरू होते. या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले.

भररस्त्यात सुरू असलेली ही हाणामारी कामावरून घरी निघालेले पोलिस अधिकारी मोरे यांच्या नजरेस पडली. ते भांडण सोडवण्यास मोरे पुढे सरसावले; मात्र शेट्टी याने दारूच्या नशेत मोरे यांनाच शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यांच्या हातांवर नखांनी वार करत त्यांना जखमीही केले; मात्र मोरे यांनी अखेर पोलिसी हिसका दाखवत शेट्टी आणि त्याचा साथीदार वैकुंठनाथ या दोघांनाही अटक केली. 

Web Title: The police officer who has gone to solve the problem beaten him