कुर्ल्यातील कॉलसेंटरचा पर्दाफाश 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

मुंबई : प्रतिबंधित औषधांची विक्री करण्याचे प्रलोभन दाखवून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. इकारामा नासीर मुकादम, अरबाज ऊर्फ अयान गफार शेख, शाहरूख अन्सारी, जुनेद शेख, कदीर सय्यद, आतिक शेख, आहाद खान, सलमान खान अशी त्यांची नावे आहेत. त्या सर्वांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

कुर्ला परिसरातील एका कॉल सेंटरमध्ये काही जण व्हीओआयपी कॉलच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना संपर्क साधून त्यांची फसवणूक करत असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण कक्ष 5 च्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सहायक आयुक्त नेताजी भोपळे, प्रभारी वरिष्ठ निरीक्षक अशोक खोत यांच्या पथकाने शुक्रवारी कुर्ला येथील सारा बिझनेस सेंटरच्या पहिल्या मजल्यावरील स्पीड टेक्‍नोलॉजीच्या कार्यालयात छापा टाकला. या वेळी आठ जण हे अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधून त्यांना अमेरिका येथून बोलत असल्याचे भासवत होते. ते व्हायग्रा आणि अन्य प्रतिबंधित औषधांच्या विक्रीचे प्रलोभन दाखवत होते. 

औषधांच्या विक्रीचे प्रलोभन 
अमेरिकन चलन घेतल्यानंतर औषधांची विक्री न करता फसवणूक करण्यात येत असे. गो ऑटो डायल या पोर्टलचा वापर करून आरोपी नागरिकांना गंडा घालत असत. परदेशात कॉल केल्यानंतर तेथील ग्राहकांना संपर्क साधण्याकरता मॅजिक जॅक गो याद्वारे एक नंबर दिला जातो. ग्राहकांनी दिलेले परदेशी चलन पेमेंट गेटवेद्वारे भारतीय चलनामध्ये वळते करून कॉल सेंटरचालकांना पैसे प्राप्त होत असायचे, अशी या गुन्ह्याची पद्धत आहे. फसवणूकप्रकरणी आठ जणांना पोलिसांनी अटक केली. कारवाईदरम्यान लॅपटॉप, 11 हार्डडिस्क, सर्व्हर, 12 मोबाईल, वायफाय राऊटरसह अन्य साहित्य जप्त केले. या गुन्ह्यात अन्य आरोपींचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या अटकेकरता पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. 
 
Web Title: Police raid on fake call center in kurla