वाशीतील साई परिक्रमा लॉजवर छापा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने वाशीतील साई परिक्रमा लॉजमध्ये चालणाऱ्या वेश्‍याव्यवसायावर छापा मारून एका अल्पवयीन मुलीसह सहा महिलांची सुटका केली. तसेच या कारवाईत पोलिसांनी लॉजच्या व्यवस्थापकासह नऊ जणांना अटक केली. 

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने वाशीतील साई परिक्रमा लॉजमध्ये चालणाऱ्या वेश्‍याव्यवसायावर छापा मारून एका अल्पवयीन मुलीसह सहा महिलांची सुटका केली. तसेच या कारवाईत पोलिसांनी लॉजच्या व्यवस्थापकासह नऊ जणांना अटक केली. 

वाशीतील साई परिक्रमा लॉजमध्ये वेश्‍यागमनासाठी दलालांमार्फत महिला व मुली पुरवण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्जुन गरड यांच्या पथकाने गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या लॉजवर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून वेश्‍यागमनाची खातरजमा केली. या वेळी या लॉजच्या व्यवस्थापकाने बनावट ग्राहकाकडून वेश्‍यागमनासाठी दोन हजार रुपये स्वीकारून त्याच्या पसंतीची महिला त्याला वेश्‍यागमानासाठी दिल्यानंतर पोलिसांच्या पथकाने या लॉजवर छापा टाकला. या वेळी या लॉजमध्ये वेश्‍याव्यवसायासाठी आणलेल्या पाच महिला व एक अल्पवयीन मुलगी आढळून आली. त्यामुळे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने लॉजच्या व्यवस्थापकासह एकूण नऊ जणांवर पिटा कायद्यासह, बाल न्याय काळजी आणि संरक्षण कायदा तसेच पॉक्‍सो कलमान्वये गुन्हा दाखल करून या सर्वांना अटक केली. तसेच या लॉजमध्ये वेश्‍यागमनासाठी आणल्या गेलेल्या पाच महिला व एका अल्पवयीन मुलीची सुटका केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police raid at Sai Parikrama Lodge in Vashi