ठाण्यात डान्स बारवर छापा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

खुशी या बारमध्ये बारबालांचे ग्राहकांसोबत अश्‍लील हावभाव आणि चाळे सुरू असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हा छापा टाकला.

ठाणे : ठाण्यातील कासारवडवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या खुशी नामक डान्स बारवर पोलिसांनी शनिवारी (ता.१७) मध्यरात्री छापा टाकला. या वेळी 38 बारबालांसहित बारमालकास पोलिसांनी अटक केली.

विनोद शेट्टी असे अटक करण्यात आलेल्या बारमालकाचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री कासारवडवली परिसरातील गायमुख येथील खुशी या बारमध्ये बारबालांचे ग्राहकांसोबत अश्‍लील हावभाव आणि चाळे सुरू असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी (ता.१७) मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास या बारवर छापा टाकला. या वेळी बारमध्ये ३८ बारबाला आढळल्या.

सोबतच बारमध्ये असलेले ग्राहक, कर्मचारी व बारमालक अशा 7 जणांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी बारमालकाविरोधात गुन्हा नोंदविला आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police raided on dance bar near Ghodbandar Road