निवडणुकीसाठी पोलिस सज्ज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

संवेदनशील मतदान केंद्रांवर करडी नजर
ंबई -  महापालिकेसाठी उद्या (ता. 21) मतदान प्रक्रिया होणार आहे. शहरात कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस सज्ज झाले आहेत. आतापर्यंत तीन हजार संशयीतांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. संवदेनशील मतदान केंद्रांच्या ठिकाणी पोलिस व्हीडिओ रेकॉर्डिंग करणार आहेत. त्यांच्या मदतीला होमगार्ड, एसआरपीएफ, क्‍यूआरटी आणि आरसीपीची पथके असतील.

च्या निमित्ताने 95 टक्के पोलिस रस्त्यांवर तैनात असणार आहेत. निवडणूक आयोगाचे भरारी पथक आणि नाकाबंदीकरता पोलिसांची खास पथके तैनात करण्यात आली आहेत. बेकायदा वस्तूंची तस्करी होऊ नये यासाठी त्यांची करडी नजर आहे. मुंबईत सात हजार 297 मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी 726 मतदान केंद्रे आणि 159 ठिकाणे संवेदनशील आहेत, असी माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते अशोक दुधे यांनी दिली. संबंधित ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. काही परिसरात खुली मतदान केंद्रे आहेत. तेथे बॅरिकेट्‌स लावण्यात आले आहेत. गुन्हे शाखा आणि विशेष शाखेचे पोलिस साध्या वेशात तैनात असतील. पोलिसांनी आतापर्यंत तीन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. 125 जणांना तडीपार केले तर एक हजार 100 जणांवर अटकेची कारवाई केली. 844 जणांविरोधात वॉरंट काढण्यात आले आहे. शस्त्रबंदी कायद्यानुसार आतापर्यंत 18 जणांनी शस्त्र जमा केली आहेत. बेकायदा दारूप्रकरणी 185 गुन्हे दाखल आहेत. संवेदशील ठिकाणी पोलिस व्हीडिओ रेकॉर्डिंग करणार आहेत.

Web Title: police ready for election