नववर्षाच्या स्वागतासाठी पोलिस सज्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

12 वाजेपर्यंतच लाऊडस्पीकरला मान्यता
मुंबई - नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत. रात्रीच्या वेळी महिलांच्या होणाऱ्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिस तैनात करण्याबरोबरच प्रत्येक पोलिस ठाण्याचे एक स्वतंत्र पथक तयार केले आहे. लोकांना थर्टीफर्स्ट साजरा करता यावा यासाठी पोलिसांनी रात्री 12 वाजेपर्यंतच लाऊडस्पीकरला मान्यता दिली.

31 डिसेंबरच्या रात्री गल्लीबोळापासून उच्चभ्रू सोसायट्या, पंचतारांकित हॉटेल्समध्ये पार्ट्या रंगतात. चौपाट्यांवर, खासगी क्‍लबमध्ये प्रचंड गर्दी होते. अशा गर्दीच्या ठिकाणांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी व सोनसाखळी चोरीच्या घटना घडू नयेत यासाठी साध्या वेशातील पोलिस तैनात करणार आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र पथकही यासाठी तयार केले आहे. दारू पिऊन वाहने चालवणाऱ्यांवर व सेलिब्रेशन करून परतणाऱ्यांवर सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतून पोलिसांचे लक्ष असणार आहे. सर्व अधिकाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यंदाही बोटपार्ट्यांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. रात्री 12 वाजेपर्यंतच लाऊडस्पीकरला मान्यता दिली आहे. चौपाट्या आणि वाहनतळाजवळ विद्युत पुरवठा करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मद्यपान केलेल्या वाहनचालकांना पर्यायी चालक किंवा खासगी वाहन उपलब्ध करून देण्यासाठी हॉटेल मालकांना सूचना दिल्या आहेत.

वेगात वाहन चालवल्यामुळे अपघात होऊ नये म्हणून काही महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलिस नाकाबंदी करणार आहेत. घातपाताच्या घटनांचा विचार करून गर्दीच्या ठिकाणी बॅरिकेटस लावले जातील. तेथे तपासणी करून कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे.
- अशोक दुधे, उपायुक्त व प्रवक्ते, मुंबई पोलिस.

Web Title: police ready for new year