अपहृत पाच मुलांची पोलिसांकडून सुटका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

अहमदाबाद, कर्नाटक, गोव्यात विक्री
मुंबई - मुलांचे अपहरण करून त्यांची परराज्यात विक्री करणाऱ्या पाच महिलांसह आणखी एकास मानखुर्द पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीद्वारे मानखुर्द पोलिसांनी पाच मुलांची सुटका केली. अहमदाबाद, कर्नाटक आणि गोव्यात या मुलांना संशयितांनी विकले होते. अपहृत मुले उल्हासनगर आणि कल्याण परिसरातील आहेत. महिला व बालविकास समितीसमोर हजर केल्यानंतर त्यांना पालकांच्या ताब्यात दिले जाईल.

मानखुर्द परिसरातील अहमद जफर कमाल खान याचे 5 डिसेंबरला अपहरण झाले होते. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांत गुन्हा दाखल झाला. परिमंडळ 6 चे पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. वरिष्ठ निरीक्षक नरेश कासले यांच्या पथकाने संशयित योगीता साळे हिला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत आशा ठाकूर, नूरजहॉं मुल्ला, प्रभावती नाईक, माला वानखेडे आणि गणेश साळे यांची नावे पुढे आली. पोलिसांनी त्यांनाही अटक केली. या सहाही जणांची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्या वेळी सहा महिन्यांत पाच मुलांचे अपहरण करून अहमदाबाद, गोवा आणि कर्नाटक येथे विकल्याची कबुली त्यांनी दिली. मुलांची गरज असणाऱ्यांची माहिती नूरजहॉं काढायची. त्यानंतर माला आणि आशा झोपडपट्ट्यांतून मुलांचे अपहरण करत असत. त्यापूर्वी दोघी परिसराची टेहळणी करायच्या. दुपारी कोणी नसल्याचे पाहून त्या मुलांचे अपहरण करायच्या. नूरजहॉं अवघ्या अडीच ते तीन लाखांत मुलांची विक्री करायची. माला आणि आशा यांनी उल्हासनगर व कल्याणमधून पाच मुलांचे अपहरण केल्याची कबुली दिली.

Web Title: Police rescued five kidnapped children