Jitendra Awhad: पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी, पण नाही केली तर...; मुलगी-जावयाला आलेल्या धमकीने आव्हाड हतबल | Police should investigate fairly, but if not Jitendra Awhad is desperate because of the threat to the daughter-son-in-law | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awhad News

Jitendra Awhad : पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी, पण नाही केली तर...; मुलगी-जावयाला आलेल्या धमकीने आव्हाड हतबल

Jitendra Awhad News - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याची धमकी आली होती. याप्रकरणी धमकीची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

याप्रकरणी आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड देखील सोबत होत्या. (Jitendra Awhad news in Marathi)

आव्हाड म्हणाले की, राजकारणाची पातळी फार मोठ्या प्रमाणात ढासळली आहे. आव्हाड यांनी दिवंगत आनंद दिघे यांचा एक किस्सा देखील शेअर केला.

यावेळी आव्हाड यांनी ऑडिओ क्लिपमधील आवाज महेश आहिरचा नाही, हे सिद्ध करून घेतलं जाईल, सत्तेत कोण आहे, हे आम्हाला माहित असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं.

आव्हाड यांच्या कन्या नताशा म्हणाल्या की, ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर आम्ही तातडीने तक्रार दाखल केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील तातडीने सुरक्षा पुरविण्याची घोषणा केली.

मात्र अद्याप आमच्याशी कोणताही संपर्क करण्यात आलेला नाही. उलट आमच्याविरुद्ध तक्रार काही क्षणात होते. मात्र आमच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही, त्यामुळे आम्ही कुठं जायचं, असा सवाल नताशा आव्हाड यांनी केला.

दरम्यान आम्हाला भेटलेल्या धमकीची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. पण चौकशी नाही, झाली तर काय करणार, अशी हतबलता आव्हाड यांनी बालून दाखवली.