पोलिस उपनिरीक्षकावर लैंगिक छळाचा आरोप 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिलेने पोलिस उपनिरीक्षकावर लैंगिक छळाचा आरोप करून सीबीडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अमित शेलार असे आरोपी पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. शेलार सध्या नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत आहे. त्याच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. 

तक्रारदार महिला व अमित शेलार हे दोघे 2010 मध्ये वाशी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. तेव्हापासून दोघांची चांगली ओळख होती. मार्च 2017 मध्ये शेलारने ज्यूसमधून गुंगीकारक पदार्थ पाजून आपल्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच, या अत्याचाराचे मोबाईलवर चित्रीकरणही केले. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आपल्यावर सीबीडी, पनवेल, खारघर, कामोठे आदी भागांत कारमधून नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेने तक्रारीत केला आहे.

लैंगिक अत्याचाराला विरोध केल्यानंतर शेलार आपणाला शिवीगाळ; तसेच हाताबुक्‍क्‍यांनी मारहाण करत असल्याचे महिलेचे म्हणणे आहे. तिच्या तक्रारीवरून सीबीडी पोलिसांनी शेलारविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली आहे. महिला पोलिसानेच एका पोलिस उपनिरीक्षकावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केल्याने नवी मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली आहे.  

Web Title: Police sub inspector allegations of sexual harassment