विक्रोळीत पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या 

विक्रोळीत पोलिसाची आत्महत्या
विक्रोळीत पोलिसाची आत्महत्या

मुंबई : विक्रोळीतील टागोरनगर येथे राहणारे पोलिस कर्मचारी रामेश्‍वर हंकारे यांनी सोमवारी (ता. 21) रात्री 8 वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रामेश्‍वर यांना फासावरून खाली उतरवत रुग्णालयात दाखल केले; डॉक्‍टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसून पोलिस पुढील तपास करत आहेत.   

रामेश्‍वर हंकारे हे मुळचे नांदेड जिल्ह्याचे रहिवासी होते. पोलिस भरतीमध्ये निवड झाल्यानंतर त्यांची मुंबईत मुख्य नियंत्रण कक्षात नेमणूक करण्यात आली होती. सोमवारी रात्री 8 वाजेच्यादरम्यान त्यांचे मित्र विक्रोळीतील त्यांच्या घरी गेले असता वारंवार दरवाजा ठोठावूनही रामेश्‍वर दरवाजा उघडत नव्हते. त्यामुळे मित्रांनी दरवाजा तोडला. मात्र, समोरच पंख्याला गळफास घेतलेल्या रामेश्‍वर यांना पाहून त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर रामेश्‍वर यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान डॉक्‍टरांनी रामेश्‍वर यांना मृत घोषित केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com