Police takes action against MNS Party Workers
Police takes action against MNS Party Workers

पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांना जमावबंदीचे आदेश

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चौकशीसाठी उद्या 'ईडी' कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 'ईडी' प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलचं तापल्याने पोलिसांनी आता खबरदारी म्हणून मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जमावबंदी आदेश जारी केले आहेत.

राज ठाकरे उद्या 22 ऑगस्टला 'ईडी' कार्यालयात उपस्थित राहणार असल्याने मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना कलम 149 अंतर्गत नोटीस जारी करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी बजावलेल्या नोटिसांमुळे मनसे कार्यकर्त्यांकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष मुनाफ पटेल यांना 149 ची नोटीस जारी झाली आहे. पटेल यांच्या प्रमाणेच मनसेच्या अनेक आक्रमक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस प्राप्त होऊ लागल्या आहेत. पोलिसांकडून जरी या प्रतिबंधक नोटीसा बजावण्यात येत असल्या तरी यामुळे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यात नाराजीचे सुर उमटत आहेत. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांततेच आवाहन केलेलं असतांना देखील पोलीस जर मनसेच्या कार्यकर्त्यांवर दबाव तंत्राचा वापर करणार असतील तर  मनसेचे कार्यकर्ते या जमावबंदी आदेशाला तीव्र विरोध करण्याची शक्यता असून यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी प्रतिक्रिया मुनाफ पटेल यांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com